ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड

 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड

राजकोट, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान रोहित शर्मा याने आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात धडाकेबाज खेळी करत इतिहास रचला आहे. आतापर्यंत ही कामगिरी क्रिकेट विश्वात कोणत्याही खेळाडूला करता आलेली नाही.
रोहित शर्माने तिसऱ्या वनडेत झोकात सुरुवात केली. रोहितच्या नावावर यावेळी चौकारापेक्षा षटकार जास्त होते. रोहितला यावेळी शतक झळकावता आले नाही, रोहितन यावेळी ५७ चेंडूंत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर ५७ चेंडूंत ८१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. पण ही खेळी साकारताना तिसऱ्या वनडेत रोहितने असा एक विक्रम रचला आहे जो आतापर्यंत कोणालाही जमलेला नाही.

रोहित शर्माने तिसऱ्या वनडेत एकूण सहा षटकार लगावले. त्याचबरोबर रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५५० षटकार पूर्ण केले आहेत. पण त्याचबरोबर रोहितने यावेळी इतिहास रचला आहे. रोहित आपल्या हिटमॅन या नावाला जागला असून एका देशात सर्वाधिक षटकार लगावण्याचा विश्वविक्रम रोहितने आता आपल्या नावावर केला आहे. एका देशात सर्वाधिक षटकारांचा विक्रम आता रोहितने आपल्या नावावर केला आहे. भारतामध्ये आता सर्वाधिक षटकार रोहितच्या नावावर जमा झाले आहेत. रोहितच्या नावावर आता भारतामध्ये सर्वाधिक २५७ षटकार झाले आहेत. त्याचबरोबर रोहितने यावेळी अजून एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.

जगभरात सर्वात जलद ५५० षटकार लगावण्याचा विश्वविक्रम आता रोहितच्या नावावर झाला आहे. रोहितने यावेळी ख्रिस गेलचा जो विश्वविक्रम होता तो रोहितने मागे सोडला आहे. आता क्रिकेट विश्वात ५५० षटकारांचा टप्पा गाठणारा रोहित हा फक्त दुसरा खेळाडू ठरला आहे. कारण रोहित आणि गेल या दोघांच्याच नावार आता ५५० षटकार आहेत. त्यामुळे आता रोहित गेलचा सर्वाधिक षटकारांचा विश्वविक्रम कधी मोडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

SL/KA/SL

27 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *