Asian Games – २ सुवर्णपदकांची कमाई करत महिला नेमबाजांची दिमाखदार कामगिरी
हांगझोऊ, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 च्या चौथ्या दिवशी भारतानं दोन सुवर्णपदकं जिंकली आहेत. दोन्ही सुवर्णपदकं भारतीय महिला खेळाडूंनी जिंकली आहेत. यासह भारतानं आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये पाच सुवर्णपदकं जिंकली आहेत. भारताच्या सिफ्ट कौर समरा हिने आशियाई खेळ 2023 मध्ये महिलांच्या 50 मीटर रायफल 3-पी वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून बुधवारी हांगझो येथे भारताला पाचवे सुवर्ण मिळवून दिले.आशी चौकसेनेही या स्पर्धेत कांस्यपदक मिळवून भारताचे नेमबाजीतील पदक आठवर आणले.
अंगद वीर सिंग बाजवा, गुर्जोत सिंह खंगुरा आणि अनंत जीत सिंग नारुका या त्रिकुटाने पुरुषांच्या शॉटगन स्कीट सांघिक स्पर्धेत ३५५ गुणांसह कांस्यपदक जिंकले आणि भारताने नववे नेमबाजी आणि एकूण २२ वे पदक निश्चित केले.
आज चौथ्या दिवशी भारत पदक तालिकेत ५ व्या स्थानी पोहोचला आहे. भारतीय खेळाडूंनी आज पर्यंत ५ सुवर्ण, ७ रौप्य आणि १० कांस्य अशी एकूण १६ पदकांची कमाई केली आहे.
ML/KA/SL
27 Sept. 2023