खलिस्तानवाद्यांचे परदेशी नागरिकत्व कार्ड होणार रद्द

 खलिस्तानवाद्यांचे परदेशी नागरिकत्व कार्ड होणार रद्द

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे.यामुळे भारत सरकार आता परदेशांतील खलिस्तानवाद्यांविरोधात कठोर पावले उचलत आहे. भारत सरकारने कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये उपस्थित असलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे आणि त्यांचे ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया म्हणजेच OCI कार्ड रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.या कारवाईनंतर हे दहशतवादी भारतात येऊ शकणार नाहीत. आयएएनएस या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, सरकारने परदेशात राहणाऱ्या दहशतवाद्यांच्या संपत्तीचीही ओळख पटवण्याचे आदेश दिले आहेत. याच्या एक दिवस आधी, शनिवारी एनआयएने खलिस्तानी दहशतवादी पन्नूची चंदीगड आणि अमृतसरमधील मालमत्ता जप्त केली होती. कायदेशीरदृष्ट्या पन्नूची ही मालमत्ता आता सरकारची आहे.

एनआयएने खलिस्तानी समर्थकांची नवी यादी जाहीर केली आहे. या यादीत परमजीत सिंग पम्मा, कुलवंत मुथडा, सुखपाल सिंग, सरबजीत बेनूर, कुलवंत, गुरप्रीत सिंग, हरजप, हरप्रीत सिंग, रणजीत नीता, गुरमीत सिंग, जसमीत हकीमजादा, गुरजंत धिल्लॉन, लखबीर रोडे, अमरदीप पुरेवाल, जतिंदर डी जेतवाल, जतिंदर डी. एस हिम्मत सिंग, वाधवा सिंग (बब्बर काका) आणि जे धालीवाल यांच्या नावांचा समावेश आहे.

ओव्हरसीज सिटीझनशिप ऑफ इंडिया योजना ऑगस्ट 2005 मध्ये सुरू करण्यात आली. यासाठी नागरिकत्व कायदा 1955 मध्ये बदल करण्यात आले. या अंतर्गत, ते सर्व लोक भारताचे परदेशी नागरिक म्हणून नोंदणी करू शकतात, जे भारतीय वंशाचे आहेत, जे 26 जानेवारी 1950 किंवा त्यानंतर भारताचे नागरिक होते किंवा जे या तारखेला भारतीय नागरिकत्वासाठी पात्र होते. याशिवाय, पाकिस्तान किंवा बांगलादेश किंवा भारत सरकारने विशेषत: उल्लेख केलेल्या इतर कोणत्याही देशाचा नागरिक नसावा.एक प्रकारे, OCI भारतात राहण्याची, काम करण्याची आणि आयुष्यभर सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार करण्याची सुविधा देते, तसेच OCI धारक त्याला हवे तेव्हा व्हिसाशिवाय भारतात येऊ शकतो. OCI कार्ड आयुष्यभर वैध असते.

SL/KA/SL

24 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *