नऊ, नव्या वंदे भारत एक्सप्रेसचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘वंदे भारत’ या अद्ययावत सुसज्ज ट्रेन्सचे जाळे आता देशभर विस्तारत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवला आहे. पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सर्व वंदे भारत ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवला. नव्याने लाँच झालेल्या वंदे भारत ट्रेन्समुळे अकरा राज्यांतील प्रवासाचा वेळ कमी होणार असून कनेक्टिव्हिटीही वाढणार आहे. या राज्यांमध्ये राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरातचा समावेश आहे.
वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून या राज्यांमधील कनेक्टिव्हिटी सुधारेल. या कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित केलं. देशातील कनेक्टिव्हिटी वाढवण्याची ही अभूतपूर्व संधी असल्याचं या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या कार्यक्रमाला 11 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि इतर उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. नव्याने लाँच झालेल्या वंदे भारत ट्रेन्सपैकी एका ट्रेनचे सारथ्य महिला लोको पायलट करणार आहे.
SL/KA/SL
24 Sept. 2023