दादरच्या हिंदू कॉलनीत लागलेल्या आगीत, ६० वर्षीय वृध्दाचा मृत्यू

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):हिंदू कॉलनीमधील बहुमजली इमारतीला शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास आग लागली. या आगीत धुरामुळे इमारतीमधील रहिवासी सचिन पाटकर (६०) यांचा गुदमरून मृत्यू झाला.
दादर पूर्व परिसरातील हिंदू कॉलनीमधील गल्ली क्रमांक २ येथील १५ मजली रेन ट्री इमारतीत शनिवारी सकाळी आग लागली. इमारतीच्या १३ व्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीमुळे इमारतीत धूर पसरला होता. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.
धुरामुळे इमारतीमधील रहिवासी सचिन पाटकर (६०) गुदमरले. त्यांना तात्काळ शीव रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी पाटकर यांना मृत घोषित केले.
दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाचे जवानांना यश आले.
ML/KA/PGB 23 Sep 2023