या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण १४ ऑक्टोबर रोजी. काय होतील त्याचे जागतिक परिणाम ?

 या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण १४ ऑक्टोबर रोजी. काय होतील त्याचे जागतिक परिणाम ?

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):अश्विन महिन्यातील अमावास्येला म्हणजेच ‘सर्वपित्री अमावस्येला’ शनिवारी दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी या वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण (Solar Eclipse) होणार आहे. ग्रहण रात्री ८ वाजून ३३ मिनिटांनी सुरू होत असून ते पहाटे २.२४ वाजता संपेल. ह्या ग्रहणाचा प्रभाव हा कन्या राशीवर आणि चित्र नक्षत्रावर जास्त असेल.

हे ग्रहण अँटिग्वा, कॅनडा, ब्राझील, जमैका, अमेरिका, कोलंबिया या ठिकाणाहून दिसेल. ग्रहणाचे परिणाम हे दीर्घकालीन असतात. Usually The Eclipse leave its after effects for long duration.
जाणून घेऊया या ग्रहणाचे परिणाम – Impact of Eclipse

संपूर्ण जगात आणि देशात येणाऱ्या काळात अशांतता,असंतोष आणि अस्वस्थता निर्माण होईल. धार्मिक अस्वस्थता वाढेल/ रोगाचे प्रमाण वाढेल
संपूर्ण जगात भांडणतंटे, मारामाऱ्या,खून,रक्तपात,
दंगे,संप,मोर्चे,अपघात,
हिंसा,उपद्रव,अपहरण,यांचे प्रमाण वाढेल. मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होईल.घरांवर दरोडे पडतील.जगात रोगाचे प्रमाण वाढेल.रोगराई फैलावेल.सैन्यातील किंवा आरमारातील अधिकारांचे मृत्यू होण्याची शक्यता. अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे मृत्यू होतील.

परराष्ट्रीय गुंतागुंतीचे प्रश्न उध्दभवतील. वृद्ध व्यक्ती /ज्येष्ठ राजकीय नेते/उद्योगपती, महत्वपूर्ण व्यक्ती तसेच कायदेतज्ञ यांच्याकरिता प्रतिकूल मृत्यू होण्याची शक्यता. रेल्वे तसेच बस सेवा यात अपराध वाढतील. वादळी वारे ,चक्रीवादळे ,हवाई अपघात होण्याची शक्यता.
सीमेवर तणाव वाढेल/अपघात होतील/भूकंपाने किंवा अग्निप्रलयाने घरांचे नुकसान, ज्वालामुखीचा उद्रेक होईल.खाणीत/विहीर/तलाव/इमारती/ सरकारी इमारती यात अपघात तसेच आगी लागण्याचे प्रकार घडतील.

सीमेवर तणाव वाढेल, पोलिसांवर हल्ले होतील.देशातील अंतर्गत स्थिती बिघडण्याची शक्यता. भूकंपाने किंवा अग्निप्रलयाने घरांचे नुकसान होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात. नैसर्गिक संकटांचा सामना करावयास लागेल. समुद्रात तलावात बोटीचे/जहाजाचे अपघात होण्याची शक्यता,
कर्मचारांच्या संपामुळे समुद्रातील व्यापारात बाधा उत्पन्न होईल.

मोठ्या पदावरील नेत्यांचे राजीनामे अथवा पायउतार/ काही राज्यात विधानसभा बरखास्त/ सत्ता परिवर्तन ,
काही राज्यात विधानसभा बरखास्त होण्याची शक्यता.अधिवेशन लवकर गुंडाळण्याची शक्यता/शेजारील तसेच मित्र राष्ट्रांशी संबंध बिघडतील. किंवा फसवणूक होईल. मोठ्या पदावरील नेत्यांचे राजीनामे अथवा पायउतार होतील. येणाऱ्या निवणुकांमध्ये काही ठिकाणी त्रिशंकू अवस्था निर्माण होण्याची शक्यता.

नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप वाढतील.सत्ता परिवर्तनाचे योग, काही संसद सदस्य,मंत्रीगण यांच्या प्रकृती बिघाड होईल,गंभीर आजारपण,अपघात,तसेच मृत्यूची शक्यता
विरोधी पक्षा करिता चांगला काळ/विरोधी पक्षाचे बोलणे प्रभावी ठरेल
येणाऱ्या काळात जगातील/विरोधी पक्ष बलवान होईल, विरोधी पक्षाच्या मनासारख्या घटना घडतील निवडणुकीत विरोधी पक्षाचा विजय होईल आणि सत्ताधाऱ्यांना अपयशाला सामोरे जावे लागेल. सरकारमधील घोटाळे उघड होतील.

काही ठिकाणी सरकारमधील ताळमेळ बिघडेल/घटक पक्षाशी विसंवाद वाढतील.काही नेते अमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकतील अथवा आरोप होतील. उष्णतेचे प्रमाण वाढेल/विजेची टंचाई भासेल/शेतकऱयांचे नुकसान/बांधकाम क्षेत्रात प्रॉब्लेम निर्माण होतील,
हवामानात मोठे बदल होतील. हवेतील उष्णतेचे प्रमाण वाढेल,पाण्याचा साठा कमी होईल.पाणी कपातीची शक्यता. काही ठिकाणी पिकांचे/शेतकऱ्यांचे नुकसान होईल. पिके करपण्याची शक्यता जास्त.

कलाकारांचे वाद वाढतील/ स्त्रियांना प्रतिकूल/ कलाकार/खेळाडू/प्रसारमाध्यमे यांना प्रसिद्धी/यश तसेच पुरस्कार जाहीर होतील/ मिळतील
देशातील मुले,मुली स्त्रिया यांच्याकरीत प्रतिकूल काळ गर्भपाताचे प्रमाण वाढेल./कलाकारांचे वाद वाढतील/उत्पन्न होतील.चित्रपटामुळे वाद निर्माण होतील. नाट्य गृहे तसेच करमणुकीचे साधने/मनोरंजनाची ठिकाणे/गायनशाळा,
यांना काही काळ प्रतिकूल. या ठिकाणी आग
लागण्याची,तसेच हिंसा,
भय,आतंकी घटना घडण्याची शक्यता.
साहित्यिक,चित्रकार, गायक किंवा कलाकार यांच्या मृत्यूने देश शोकसागरात बुडेल. शाळा.कॉलेज मधील उत्सवात आग लागू शकते.
येणाऱ्या काळात शेअर/स्टॉक मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता/चढउतार पाहावयास मिळतील.

तीळ,तेल,खाण्याच्या लाल,पिवळ्या वस्तू,
तंबाखू, तांबे ह्यांच्यात दोन महिन्यानंतर तेजी येईल सोने,चांदी,पितळ ह्या धातूंच्या बाजारात अस्थिरता निर्माण होईल परंतु काही काळानंतर तेजी येईल.

जितेश सावंत

के. पी. विशारद , नक्षत्र सम्राट, वास्तू तज्ञ (Astro Vastu Consultant)

शेअर बाजार तज्ञ/ सायबर कायदा(cyber law) अभ्यासक

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB 22 Sep 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *