ज्येष्ठां गौरींचे घरोघरी विधिवत आणि थाटामाटात आगमन…
अहमदनगर, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभरात गणपतींच्या पाठोपाठ गौरींचेही अर्थात महालक्ष्मीची आज सोनपावलांनी घरोघरी विधिवत तसेच थाटामाटात स्थापना करण्यात करण्यात आली.
सोनपावलांनी आगमन होत असताना कुमारिका, गौरींसाठी पुढे हळदी कुंकवाचे ठसे उमठवित असते त्या पाऊलांवरून गौरी चालतात.महालक्ष्मीची घरोघरी स्थापना करण्यात आल्यानंतर आज पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून भक्तिभावाने आरती करण्यात आली. उद्या दुसऱ्या दिवशी गौरींचे विधिवत पूजन करण्यात येते. या दिवशी पुरण पोळीसह मिष्ठान्न भोजनाचा नैवेद्य दाखविला जातो. हा दिवस यात महत्वपूर्ण मानला जातो. तसेच तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी गौरीना भावपूर्ण निरोप दिला जातो.
महालक्ष्मीच्या आगमनाची महिला भगिनी आणि गृहिणींना सारखी ओढ लागून असते. त्यानिमित्त आकर्षक फुलांची तसेच विद्युत रोषणाई करण्यात येते. तसेच गौरींच्या पुढ्यात बाळांसाठी विविध खेळणी मांडण्यात येते. तीन दिवसीय गौरींच्या आगमनापासून ते त्यांना निरोप देईपर्यंत घरातील वातावरण प्रसन्न राहते. या काळात काही स्त्रिया कडक व्रत धारण करतात. तसेच काही ठिकाणी विविध कार्यक्रम आणि सजावटीच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
ML/KA/SL
21 Sept. 2023