सततच्या पावसाने गोसीखुर्द चे दरवाजे पुन्हा उघडले

भंडारा, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवामान खात्यातर्फे भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत पावसाने सकाळपासूनच सुरूवात केलेली आहे. रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये कधी कधी मुसळधार पाऊस ही बरसतो आहे. तान्हा पोळ्याच्या उत्साहावर या पावसामुळे विर्जन पडला असला तरी या पावसामुळे बळीराजा सुखावलेला आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत.
गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला असल्यामुळे धरण सुरक्षेच्या दृष्टीने धरणाचे ३३ ही दार आर्ध्या मिटर ने उघडण्यात आले असून या मधून ३८७१ क्यूमेक्स पाण्याच्या विसर्ग होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून पुढील काही तासात आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने 4500 ते 6000 क्युमेक्स पर्यंत विसर्ग सोडण्यात येईल. तरी नदीपात्रात आवागमन करू नये आणि नदीकाठावरील गावकर्यांनी विशेष खबरदारी बाळगावी तसेच सतर्क राहावे अशी विनंती प्रशासनातर्फे करण्यात आलेली आहे.
ML/KA/SL
15 Sept. 2023