One Day Cricket क्रमवारीत या देशाने पटकावले प्रथम स्थान

 One Day Cricket क्रमवारीत या देशाने पटकावले प्रथम स्थान

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने (ICC) काल जाहीर केलेल्या एकदिवसीय संघ क्रमवारी ऑस्ट्रेलियाचा संघ वनडेमध्ये नंबर 1 ठरला आहे. पाकिस्तानला मागे टाकत स्ट्रेलिया अव्वल स्थानावर पोहोचला आहे. गेल्या महिन्यात, आशिया चषक सुरू होण्यापूर्वी, पाकिस्तानने श्रीलंकेत अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका 3-0 ने जिंकली आणि ऑस्ट्रेलियाला मागे टाकून ICC एकदिवसीय क्रमवारीत क्रमांक 1 बनला. पण, आता पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. तर टिम इंडीया तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.

ऑस्ट्रेलियाने शनिवारी पाच एकदिवसीय सामन्यांच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून क्रमवारीत पहिले स्थान मिळवले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलियाचे एकूण 121 रेटिंग गुण झाले असून त्यांनी पाकिस्तानला एका रेटिंग गुणाने मागे टाकले आहे. ICC क्रमवारीत भारत 114 रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाने सलग पाचवा विजय नोंदवला. टी-20 मालिका 3-0 ने जिंकल्यानंतर संघाने एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना 123 धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लॅबुशेन यांनी शतके झळकावली. दुसऱ्या डावात लेगस्पिनर अॅडम झाम्पाने 4 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला लक्ष्य गाठू दिले नाही.

ब्लूमफॉन्टेन येथील मँगॉन्ग ओव्हल मैदानावर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 8 गडी गमावून 392 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 41.5 षटकांत 269 धावा करून सर्वबाद झाला. संघातील एकाही खेळाडूला अर्धशतक करता आले नाही. ऑस्ट्रेलियाकडून 124 धावा करणारा लॅबुशेन सामनावीर ठरला.

SL/KA/SL

10 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *