मॅच फिक्सिंग प्रकरणी प्रसिद्ध क्रिकेटपटूला झाली अटक

 मॅच फिक्सिंग प्रकरणी प्रसिद्ध क्रिकेटपटूला झाली अटक

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीलंकेचा क्रिकेटपटू सचित्रा सेनानायके याला आता मॅच फिक्सिंगच्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. आता त्यानंतर श्रीलंका क्रिकेट मंडळ कोणते ठोस पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्रा सेनानायकेला बुधवारी मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. आज सकाळी शरणागती पत्करल्यानंतर त्याला क्रीडा भ्रष्टाचार अन्वेषण युनिटने अटक केली. तीन आठवड्यांपूर्वी त्याला परदेशात जाण्यास न्यायालयाने बंदी घातली होती. सेनानायके याच्यावर लंका प्रीमियर लीगच्या (LPL) 2020 साली झालेल्या हंगामात मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता, जिथे त्याने दोन खेळाडूंना मॅच फिक्स करण्यासाठी प्रलोभित केले होते.

३८ वर्षीय सचित्रा सेनानायके २०१२ ते २०१६ या कालावधी दरम्यान एक कसोटी, ४९ एकदिवसीय सामने आणि २४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. आयपीएल २०२३ मध्ये त्याने कोलकाता नाइट रायडर्सकडून आठ सामनेही खेळले.

SL/KA/SL

6 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *