धाराशिव येथे रंगणार 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार
धाराशिव, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): धाराशिव इथं एक ते पाच नोव्हेंबर 2023 दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे.धाराशिव येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आणि धाराशिव कुस्ती तालीम संघ यांनी या कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेत राज्यातील 45 वेगवेगळे जिल्हा संघ सहभागी होतील त्यातून 450 खेळाडू माती आणि 450 खेळाडू गादी गटात असे 900 खेळाडू सहभागी होतील, माती आणि गादी असे 10 वेगवेगळे वजन असे 20 गटात या कुस्ती स्पर्धा होणार आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे ललित लांडगे ,भरत मेकाले ,दयानंद भक्त , सर्जेराव शिंदे तसेच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर अण्णा पाटील यांनी आज उस्मानाबाद येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा धाराशिव शहरातील तुळजाभवानी क्रीडा संकुलात होणार आहे.धाराशिव जिल्ह्याला पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनाचा मान मिळत आहे.
या स्पर्धा पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक लाख प्रेक्षक बसतील अश्या स्वरूपाची व्यवस्था असणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी अंदाजे 2 कोटी रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
प्रथम बक्षीस चांदीची मानाची गदा आणि 30 लाख रुपये किमतीची स्कर्पिओ गाडी हे पारितोषिक असणार आहे.तर द्वितीय बक्षीस महिंद्रा ट्रॅक्टर आहे. ही स्पर्धा 20 गटात स्पर्धा होणार असून प्रत्येक गटातील प्रथम विजेत्याला बुलेट, रोख पारितोषिक बक्षीस म्हणून दिल जाणार आहे. तर उत्तजनार्थ 12 लाख बक्षिसे दिली जाणार आहेत.
या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक नेते राहणार वेगवेगळ्या दिवशी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक सुधीर अण्णा पाटील यांनी या पत्रकार परिषदेत दिली. The thrill of the 65th Maharashtra Kesari Tournament will be held at Dharashiv
ML/KA/PGB
3 Sep 2023