FTII च्या अध्यक्षपदी या प्रसिद्ध अभिनेत्याची निवड

 FTII च्या अध्यक्षपदी या प्रसिद्ध अभिनेत्याची निवड

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रॉकेट्री: द नंबी इफेक्ट,3 इडियट्स, तनु वेड्स मनू आणि तनु वेड्स मनु रिटर्न्स, रेहना है तेरे दिल में’ या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारणारा अभिनेता आर. माधवन याची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. माधवनची नियुक्ती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकद्वारे ही नियुक्ती जाहीर केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी माधवनला शुभेच्छा दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी माधवनच्या रॉकेट्री : द नंबी इफेक्ट या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी लिहिले – एफटीआयआयचे अध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून नामांकन मिळाल्यावर आर. माधवन यांचे हार्दिक अभिनंदन. मला आशा आहे की संस्थेला तुमच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा होईल. मला आशा आहे की तुम्ही या संस्थेला अधिक उंचीवर घेऊन जाल.

आर. माधनवने FTII च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ट्विटरवर लिहिले आहे की,” या सन्मानासाठी मी तुमचे मनापासून आभार मानू इच्छितो. सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल.”

माधवन दोन दशकांहून अधिक काळ फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहे. त्याने 2001 मध्ये ‘रेहना है तेरे दिल में’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याच्या रॉकेट्री: द नंबी इफेक्टला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार (2021) मिळाला आहे. हा चित्रपट इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवन संघर्षाची कथा आहे. नंबी नारायणनवर देशद्रोहाचा आरोप कसा होतो आणि ते त्यातून कसे मुक्त होतात आणि PSLV चे इंजिन कसे बनवतात हे या चित्रपटात दाखवले आहे.

SL/KA/SL

2 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *