‘महेंद्रगिरी’ युद्धनौकेचे जलावतरण

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते आज ‘महेंद्रगिरी’ या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे मुंबईतील माझगाव गोदी येथे जलावतरण करण्यात आले. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच माझगाव गोदीचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
आज सकाळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे आज एक दिवसाच्या मुंबई भेटीसाठी सपत्निक आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. आगमनानंतर उपराष्ट्रपतींना राज्य पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.’Mahendragiri’ dedicated the nation
ML/KA/PGB
1 Sep 2023