इंडियाच्या बैठकीसाठी सोनिया आणि राहुल गांधी मुंबईत
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेस नेते सोनिया आणि राहुल गांधी यांचे आज मुंबई विमानतळावर आगमन झाले. जुडेगा भारत जितेगा इंडिया ,
जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांच्या गजरात मुंबई विमानतळावर सोनिया आणि राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले. काँग्रेस नेते अशोक चव्हाण , नसीम खान, शिवसेना ठाकरे गटाच्या अनिल परब , सचिन अहिर आदींनी त्यांचे स्वागत केले.
SL/KA/SL
1 Sept. 2023