पंतप्रधानांनी बोलावले विशेष अधिवेशन, कारण मात्र गुलदस्त्यात

 पंतप्रधानांनी बोलावले विशेष अधिवेशन, कारण मात्र गुलदस्त्यात

नवी दिल्ली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 20 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान संसेदचं पावसाळी अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात मणिपूरच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता. विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत येऊन यावर बोलावं या मागणीवर अडून राहिले होते. त्यांनंतर आता केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवरून दिली आहे.18 ते 22 सप्टेंबरपर्यंत हे अधिवेशन पार पडणार आहे. यादरम्यान एकूण 5 बैठका होणार आहेत. लोकसभेचं हे 13 वं अधिवेशन आणि राज्यसभेचं 261 वं अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

संविधानाच्या कलम 85 मध्ये संसदेचे अधिवेशन बोलवण्याची तरतूद आहे. या अंतर्गत सरकारला संसदेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे. संसदीय प्रकरणांमधील कॅबिनेट समिती यासंबंधी निर्णय घेतं आणि राष्ट्रपतींद्वारे औपचारिक केले जाते, ज्याद्वारे खासदारांना (संसद सदस्य) अधिवेशनासाठी बोलावलं जातं.

ML/KA/SL

31 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *