अदानी प्रकरणी राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना तीन सवाल

 अदानी प्रकरणी राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना तीन सवाल

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर त्यांनी विमानतळाजवळच्या ग्रँड हयात या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून राहुल गांधी यांनी अदाणी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करत सवाल उपस्थित केले. राहुल गांधी म्हणाले, अदाणींच्या कंपनीत पैसा कोणाचा आहे? तो पैसा अदाणींचा आहे की आणखी कोणाचा आहे? जर तो पैसा अदाणींचा नसेल तर मग तो नेमका कोणी गुंतवला आहे? याची उत्तरं मिळाली पाहिजेत.

राहुल गाधी यांनी तीन आंतरराष्ट्रीय आर्थिक वर्तमानपत्रांमधील बातम्या दाखवल्या. यामध्ये गौतम अदाणी आणि नरेंद्र मोदी यांच्यातील संबंधांवर भाष्य करण्यात आलं आहे. तसेच अदाणी यांच्या घोटाळ्यांमध्ये पंतप्रधानही सहभागी असल्याचं म्हटलं आहे. या वर्तमानपत्रांनी यासंबंधीचे पुरावे त्यांच्याकडे आहेत असंही म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी या बातम्या पत्रकार परिषदेत वाचून दाखवल्या.

खासदार राहुल गांधी यावेळी म्हणाले, गौतम अदाणी हे त्यांच्या परदेशी भागीदारांबरोबर मिळून भारतातल्या शेअर बाजाराची दिशाभूल करत आहेत. परदेशी भागीदारांबरोबर मिळून भारतातल्या पायाभूत सुविधा ते खरेदी करत आहेत. परंतु, पंतप्रधान मोदी यावर काहीच बोलत नाहीत, ते याप्रकरणी शांत आहेत.

राहुल गांधी म्हणाले, या सगळ्या कामात गौतम अदाणी यांचा भाऊ विनोद अदाणी हा मास्टरमाईंड आहे. त्यांचे दोन भागीदार आहेत. यापैकी एक म्हणजे नसमी अली शबान अली आणि दुसरा चांग चुंग लींग हा एक चिनी नागरिक आहे. एकीकडे गौतम अदाणी हे या परदेशी व्यावसायिकाबरोबर मिळून भारतातल्या संस्था, विमानतळं, बंदरं आणि पायाभूत सुविधा विकत घेत आहेत, भारतातल्या शेअर बाजाराची दिशाभूल करत आहेत. दुसऱ्या बाजूला ते चिनी व्यावसायिकाबरोबर भागीदारी करत आहेत. हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे. कारण अदाणी यांची कंपनी देशाच्या संरक्षण विभागात, बंदरांच्या क्षेत्रात काम करत आहे.

SL/KA/SL

31 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *