डेंग्यूची लस पुढील वर्षभरात बाजारात

 डेंग्यूची लस पुढील वर्षभरात बाजारात

पुणे, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात दरवर्षी पावसाळ्याच्या काळात डेंग्यू आजाराचे अनेकजण त्रस्त होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, दरवर्षी जगभरात १० ते ४० कोटी डेंग्यू तापाचे रुग्ण आढळतात. यावर रामबाण उपाय म्हणून पुणे येथील सिरम इन्स्टीट्युट पुढील वर्षी पर्यंत डेंग्युवरील लस उपलब्ध करून देणार आहे. पुणे स्थित, आशियातील सर्वात मोठी लस निर्माता, सीरम इन्स्टिट्यूट डेंग्यू विषाणूच्या चारही प्रकारांवर उपचार करण्यासाठी जैविक थेरपी विकसित करत आहे. सीरम इंडिट्युटचे सीईओ अदार पूनावाला यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सिरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी सांगितले की, वर्षभरात आम्ही डेंग्यू उपचार आणि डेंग्यू लस विकसित करू. आफ्रिकन देश आणि भारतात या नवीन लसीची खूप गरज आहे, जिथे लाखो लोकांना या आजाराची लागण होत आहे.

लस निर्मितीबरोबरच काही कायदेशीर प्रक्रियादेखील सीरम इन्स्टीट्युटला पार पाडायच्या आहेत. यामध्ये देशातील औषध प्रसारासाठी जलदगती मंजुरीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडे अर्ज करण्यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. सीरमने तिचे तंत्रज्ञान वापरण्यासाठी यूएस-आधारित बायोटेक्नॉलॉजी कंपनी (व्हिस्टेरा) सोबत सहकार्य केले आहे.

ML/KA/SL

30 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *