नागरिकांना अडचणी दूर करण्यासाठी पालिकेची समिती

 नागरिकांना अडचणी दूर करण्यासाठी पालिकेची समिती


मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पालिकेकडून देण्यात येणाऱ्या विविध परवाना प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने नेमण्यात आलेल्या समितीचे सदस्य तसेच मुंबईतील विविध व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात आज बैठक झाली . परवाना देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुलभता आणण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील असून . कागदपत्रे पडताळणी प्रक्रियेच्या बाबतीत शासनाच्या पारपत्र विभाग आणि आयकर विभागाच्या धर्तीवर सुलभ आणि जलद कार्यपद्धती अंमलात आणली जाईल. विविध व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींकडून आलेल्या सूचनांचा विचार करून परवाने देण्याची पद्धत सुलभ आणि पारदर्शक करण्यात येईल, असे आश्वासन अति पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी यावेळी दिले. Municipal committee to solve problems of citizens

परवाना देण्याची प्रक्रिया अधिकाधिक लोकाभिमुख करता यावी, यासाठी नागरिक तसेच व्यावसायिकांकडून सूचना मागविल्या होत्या. या सूचना तसेच त्यांच्या विविध अडचणी समजून घेण्याचा उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पालिकेच्या वतीने नागरिक तसेच व्यवसायिकांना त्यांच्या विविध प्रकारच्या व्यवसायांसाठी तसेच प्रयोजनांसाठी परवाना दिले जातात. त्यामुळे नागरिकांना पालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये व्यवसाय करता येतो. परंतु, परवाना देण्याच्या प्रक्रियेत अडचणी येतात, परवाने विहित मुदतीत मिळत नाहीत, अशा आशयाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे, आयकर विभाग तसेच पासपोर्ट विभागामध्ये राबविल्या जाणाऱ्या प्रक्रियेच्या धर्तीवर पालिकेतील परवाना देण्याची प्रक्रिया सुलभ आणि अद्ययावत व्हावी, यासाठी अति आयुक्त डॉ. शिंदे यांनी उपआयुक्त विश्वास शंकरवार यांच्या अध्यक्षतेखाली मागील महिन्यात परवाना सुधारणा समिती नेमली आहे. याच समितीच्या वतीने विविध व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

ML/KA/PGB
30 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *