मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी आज (बुधवार) मंत्रालयासमोरील प्रतापगड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘जनता दरबारात ‘ राज्यातील जनतेशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच जनतेच्या विविध सूचना व मागण्यांही त्यांनी समजून घेतल्या. Food and Drug Administration Minister Dharmarao Baba Atram interacted with activists at Janata Darbar
या जनता दरबाराला महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नेहमीच, ‘जनता दरबार’ भरवण्याचं धोरण ठेवलं आहे. कार्यकर्ते आणि नेते समोरासमोर येऊन चर्चा करतात. कार्यकर्ते आपल्या समस्या पक्षाच्या नेतृत्वापुढे मांडतात आणि पक्ष नेतृत्व त्याबाबत कार्यकर्त्यांना काही सूचना करतात. गेली अनेक वर्ष हाच शिरस्ता राष्ट्रवादी काँग्रेसनं राबवल्याचं पाहायला मिळालं आहे.
कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा ‘जनता दरबार’ आयोजित करून तळागाळातील जनतेशी व कार्यकत्यांशी संवाद साधून
कार्यकर्त्यांना समोरासमोर मंत्र्यांना भेटण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
आजच्या जनता दरबारात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी राज्यातील जनतेशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना आश्वासित केले.
ML/KA/PGB
30 Aug 2023