धरणग्रस्तांनी केले मंत्रालयातील जाळीवर आंदोलन

 धरणग्रस्तांनी केले मंत्रालयातील जाळीवर आंदोलन

अमरावती, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  येथील धरणग्रस्त पुनर्वसनासाठी मंत्रालयात संबधित पदाधिकारी आणि अधिकारी यांना भेटण्यास आले असताना त्यांची भेट न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या बाधितानी थेट मंत्रालयाच्या दुसऱ्या माळ्यावरील जाळीवर जाऊन आंदोलन केले .The dam victims protested against the grid in the ministry

अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयात घुसून मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन केले. आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा आत्महत्या करू, असे म्हणत आंदोलनकांनी मंत्रालयातील दुसऱ्या माळ्यावरून सरंक्षक जाळ्यांवर उड्या मारल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी परिसरामध्ये अप्पर वर्धा धरण आहे. १०३ दिवसांपासून हे शेतकरी मोर्शी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत होते. मात्र १०३ दिवस उलटूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले. उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा सुद्धा न केल्यामुळे या शेतकऱ्यांनी न्याय न मिळाल्याने थेट मंत्रालयात आंदोलन केले. मंत्रालयात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले.

ML/KA/PGB
29 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *