अल्प दरात ताडोबात करता येणार आता जिप्सी सफारी
चंद्रपूर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जिप्सी चे दर खूप जास्त असल्याने अनेक पर्यटक कॅन्टर नी सफारी करतात. कॅन्टर मध्ये प्रतिव्यक्ती 500 रुपये आकारण्यात येत असल्याने आर्थिक दृष्ट्या हे किफायतशीर आहे मात्र कॅन्टर हे बसच्या आकाराचे असल्याने ताडोबाच्या चिंचोळ्या मार्गावर पूर्ण जागा घेतात. सोबतच कॅन्टर चा आवाज पण जास्त असल्याने गाडीची चाहुल लागताच प्राणी पळून जातात आणि वन्यप्राणी जवळून पाहता येत नाही. त्यामुळे ताडोबा प्रशासनाने आता 9 पर्यटक बसू शकतील अशा ६ विशेष जिप्सी विकत घेतल्या आहेत.
मुख्य म्हणजे या जिप्सी मध्ये देखील अतिशय कमी दर आकारण्यात येणार आहे. ताडोबा कोर झोनचा पुढील सिझन म्हणजे 1 ऑक्टोबर पासून या जिप्सी पर्यटकांच्या सेवेत रुजू करण्याचा ताडोबा प्रशासनाचा विचार आहे.
ML/KA/SL
29 Aug 2023