सुनील गावस्कर मिडविकेट स्टोरीजचे मुख्य सल्लागार
मुंबई दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):महान माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची मिडविकेट स्टोरीजच्या मुख्य सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयसीसी वर्ल्डकपदरम्यान नोव्हेंबर 2023 रोजी मिडविकेट स्टोरीजच्या इंडियन लिग लिजेंड्सच्या लॉन्चिंगच्या पार्श्वभूमीवर गावस्कर यांच्या नियुक्तीच्या रूपाने आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा करताना आनंद होत असल्याचे मिडविकेट स्टोरीचे संस्थापक निशांत दयाल आणि सह-संस्थापक जया प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.मुंबईत होणाऱ्या भारतातील पहिल्या लेगपूर्वी, यजमान भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या लढतीच्या पार्श्वभूमीवर वेस्ट इंडिजचा सुपरस्टार, ‘युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल आणि ‘टर्बोनेटर’ हरभजन सिंग हे प्रमुख पाहुणे असतील, असे दयाल आणि प्रसाद यांनी पुढे सांगितले. यावेळी सुनील गावस्कर म्हणाले,या अभिनव उपक्रमाचा एक भाग बनून मला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. आता तुम्हाला तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूबद्दल सर्वकाही माहित असते. मात्र, संवादावरील मर्यादा असताना आणि सोशल मीडिया नसताना केवळ मिळवलेले विजय, जिंकलेल्या स्पर्धा, जेतेपद याद्वारे क्रिकेटपटूंशी संवाद व्हायचा. त्यांना जाणून घ्यायला मिळायचे. मात्र, ‘मिडविकेट स्टोरीज हा क्रिकेटच्या दिग्गजांसह माझ्या सर्व सहकाऱ्यांना व्यक्त होण्यासाठी, आठवणी शेअर करण्यासाठी तसेच प्रेक्षकांचे लाइव्ह मनोरंजन करण्यासाठी एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर मी गेल आणि हरभजनशी संवाद साधण्यास उत्सुक आहे. गेल हा पॉवर पॅक्ड कोट्स देईल तर हरभजन त्याच्या अनोख्या स्पिन गोलंदाजीप्रमाणे त्यावर अनोव्या कॉमेंट्स करेल, मिडविकेट स्टोरीजचे संस्थापक निशांत दयाल यांनी त्यांच्या संकल्पनेचे महत्व विषद करताना सांगितले की, क्रिकेटच्या प्रेमीना (जसे की मी) जीवनात एकदा त्याच्या आवडत्या क्रिकेटपटूंशी जवळीक साधण्याची, भेटण्याची आणि संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा आमचा या मागचा प्रमुख उददेश आहे. पैसे खर्च करून असा अनुभव तुम्ही मिळवू शकत नाही. या भेटीदरम्यान, संवाद दरम्यान तुम्ही एका क्षणासाठी या सर्व घटनांमध्ये स्वतःला शोधू शकता. मिडविकेट स्टोरीज् हे क्रिकेटच्या धाडसी कथा सर्वासमोर आणणार आहे, ज्याचे उदिष्ट त्याच्या शैलीतील सर्वोत्कृष्ट आहे. एक्का रॅकॉन्टेअर्सने पुन्हा अनुभवलेले अनुभव या हृदयस्पर्शी कथा सर्वांना अत्याधुनिक आसन प्रदान करण्यासाठी आहेत, सनील गावस्कर हे त्याचाच एक भाग आहे. मिडविकेट स्टोरीज आम्हाला समृद्ध अनुभव मिळविण्यात मदत करतील.चाहत्याच्या अनुभवाबाबत कार्यक्रमात बोलताना मिडविकेट स्टोरीजच्या सह-संस्थापक जया प्रसाद म्हणाल्या की, मिडविकेट स्टोरीज्च्या माध्यमातून, अगदी जेवण करता करता (डायनिंग) चाहते दिग्गजांशी संवाद साधू शकतील. सेलेब्रिटी त्याचे अनुभव शेअर करू शकतील. यासोबत क्रिकेटपटू हे चाहत्यासमवेत ऑफ द फिल्ड आणि ऑन द फिल्ड गोष्टीबाबत मनमोकळेपणाने बोलतील. यादवारे दिग्गज क्रिकेटपटू आणि चाहत्यांमधील अंतर कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आयुष्यात एकदाच येणारा अनुभव ज्याचा आस्वाद काही निवडक लोक पढील काही दिवसांत घेऊ शकतील. या वर्षाच्या सुरुवातीला दुबईमध्ये झालेल्या सीरिजमध्ये माजी महान अष्टपैलू आणि वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार व्हिव्हियन रिचर्डस यांनी विक्रमादित्य सुनील गावस्कर यांची मनमोकळेपणाने प्रशंसा केली होती. सनी गावस्कर हे भारतातील क्रिकेटचे गॉडफादर आहेत. यापूर्वी, सिडनी (ऑस्ट्रेलिया) आणि दुबईमधील (यूएई) इव्हेंटमध्ये क्रिकेटच्या विविध पैलूवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे अनेकांनी या इव्हेंटला पसंती दर्शवली. तसेच त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
ML/KA/PGB 28 Aug 2023