दुष्काळाच्या कळा सहवेना,पाण्याची वणवण थांबेना
जालना, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठवाडा तसेच राज्यात पावसा अभावी पिकांबरोबरच पिण्याच्या पाण्याच मोठं संकट दिसू लागलंय.जालना जिल्ह्यातही पाहिजे तसा समाधानकारक पाऊस आजपर्यंत न पडल्यामुळे पाण्याचे एक मोठे संकट उभे ठाकले आहे. The key of drought did not stop, the fire of water did not stop
पावसाळा सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले,तिसरा महिना ही संपत आला आहे पण अद्याप जोरदार पाऊस न पडल्यामुळे नदीनाल्यांना पाणी आलेले नाही, परिणामी विहिरींमध्ये ही पाणीसाठा झालेला नाही. यामुळे शेतीसाठी आणि जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे.जोरदार पाऊस पडावा,नदी नाल्यांना पाणी यावे, विहिरींच्या पाणी पातळीत वाढ व्हावी आणि जनतेच्या तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या करिता जालना शहरात मुस्लिम बांधवांनी चांगल्या पावसासाठी अल्लाकडे दुवा मागितली. शहरातील कदीम जालना भागातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत यासाठी प्रार्थना केली.
ML/KA/PGB
26 Aug 2023