सलग पाचव्या आठवड्यात बाजारात (Stock Market) घसरण

 सलग पाचव्या आठवड्यात बाजारात (Stock Market) घसरण

मुंबई, दि. 26 (जितेश सावंत): 25 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात बाजार घसरणीसह बंद झाला. मे 2022 नंतर प्रथमच विकली बेसिस वरती सलग पाचव्या आठवड्यात बाजाराने घसरण नोंदवली.कमकुवत जागतिक बाजारपेठां आणि अमेरिकेत होणाऱ्या केंद्रीय बैठकीपूर्वी गुंतवणूकदारांनी बाजारात सावध पवित्रा घेतला.गुंतवणूकदार व्याजदरांच्या भविष्यातील दिशेच्या संकेतांसाठी भाषणाची वाट पाहत असल्याने बाजारात निराशा जाणवली. त्याचप्रमाणे गुरुवारी रिझव्‍‌र्ह बँकेने जाहीर केलेल्या आपल्या मिनिट्स मध्ये चलनवाढीच्या दबावामुळे आणखी दर वाढ होण्याची शक्यता असल्याचे संकेत दिल्यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांना जबर धक्का बसला.

आठवड्यातील पहिली पहिली तीन सत्रे सकारात्मक नोटवर बंद झाल्यानंतर, पुढील दोन सत्रांमध्ये भारतीय शेअर बाजार दबावाखाली आले.
शुक्रवारी अमेरिकन बाजार बढत घेऊन बंद झाले. Dow Jones +247.48 अंकांनी वधारला. शुक्रवारी
फेडरल रिझव्‍‌र्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी महागाई खूप जास्त असल्याने या वर्षी आणखी दर वाढीचे संकेत दिल्यानंतर यूएस बाजार नकारात्मक झाले पण त्यांनी पुढे सांगितले की मागील दर वाढीमुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे मंदावली होती म्हणून पुढील दर वाढीबाबत सावधगिरीने निर्णय घेतला जाईल.या विधाने बाजार वधारला. Stocks gain after Powell delivers cautious message
पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष 31ऑगस्ट रोजी जाहीर होणाऱ्या भारताच्या 2Q GDPचे आकडे व Fiscal Deficit चे आकडे याकडे तसेच जागतिक घडामोडींकडे असेल.

Technical view on nifty-.

बाजारात गेल्या आठवड्यात अस्थिरता वाढताना दिसली.बाजार तांत्रिकदृष्ट्या थोडा कमकुवत झाला आहे.
शुक्रवारी निफ्टीने 19256.8 चा बंद भाव दिला. येणाऱ्या आठवड्यात निफ्टी साठी 19201-19189 हे महत्वाचे सपोर्ट स्तर आहेत हे तोडल्यास निफ्टी 19189-19076-19024-18972-18861 हे स्तर गाठेल. वरच्या स्तरावर निफ्टीसाठी 19300-
19310-19327-19361-19373-19385-19412-19444-19472-19538-19554 हे स्तर रेसिस्टन्स (resistance) ठरतील.
बाजारातील पडझडीचा गुंतवणूकदारानी फायदा उचलावा आणि दीर्घकाळाकरिता गुंतवणूक करावी.

सेन्सेक्स 267 अंकांनी वधारला

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजाराने मागील सत्रातील तोटा पुसून काढला. बाजाराची सुरुवात सपाट झाली परंतु हळूहळू बाजाराने वेग पकडला आणि बाजारात तेजी आली.निफ्टीने 19,400 चा टप्पा पार केला. बाजारात सोमवारी सर्व क्षेत्रांमध्ये खरेदी दिसून आली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 267.43 अंकांनी वधारून 65,216.09 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 83.40 अंकांची वाढ होऊन निफ्टीने
19,393.60 चा बंद दिला. Sensex up 267 points

बाजाराचा सपाट बंद

अत्यंत शांत अश्या सुरुवातीनंतर बाजाराचे कामकाज एका विशिष्ट मर्यादेत राहिले परंतू बाजाराचा कारभार ग्रीन टेरिटरी मधेच राहिला. तथापी शेवटच्या तासातील नफावसुलीने बाजार खाली आला आणि सपाट बंद दिला. मार्केट मागील सत्रातील नफा पुढे नेण्यात अयशस्वी ठरले.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 3.94 अंकांनी वधारून 65,220.03 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 2.90 अंकांची वाढ होऊन निफ्टीने19,396.50 चा बंद दिला.Sensex ends flat amid range-bound trade

मेटल बँक,कॅपिटल गुड्स मधील समभागांच्या खरेदीमुळे बाजार वधारला
अत्यंत सपाट अश्या सुरुवातीनंतर दुपारपर्यंत बाजार एका विशिष्ठ पातळीभोवती फिरत होता परंतु दुपारनंतर झालेल्या खरेदीने बाजार बंद होताना दिवसाच्या उच्चतम पातळीजवळ बंद झाला.मेटल बँक,कॅपिटल गुड्स आणि रिअलटी स्टॉक्स मधील समभागांच्या खरेदीमुळे बाजार वधारला. चांद्रयान-3 मोहिमेशी संबंधित समभाग आणि संरक्षण क्षेत्रातील शेअर्स देखील वाढले.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 213.27 अंकांनी वधारून 65,433.30 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 47.50 अंकांची वाढ होऊन निफ्टीने19,444 चा बंद दिला. Banks, Metals, and Capital Goods lift Sensex 213 pts

बाजार सकाळची तेजी टिकवण्यात अयशस्वी

गुरुवारी सकारात्मक जागतिक संकेतांमुळे बाजाराने जोरदार सुरुवात केली आणि सुरुवातीच्या तासांत नफा वाढवला पण नंतर दुपारनंतर मोठ्या प्रमाणावर विक्रीमुळे बाजार घसरला आणि दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. अत्यंत उशीर अश्या सत्रात बाजार सकाळची तेजी टिकवण्यात अयशस्वी झाला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 180.96 अंकांनी घसरून 65,252.34 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 157.30 अंकांची घट होऊन निफ्टीने19,386.70 चा बंद दिला. The market failed to hold on to opening gains and ended near the day’s low in a volatile session

सेन्सेक्स 366 अंकांनी घसरला

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आणि सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण झाली. बाजाराची सुरुवात गॅप डाउनने झाली आणि दिवसभर बाजार लाल रंगात राहीला, गुरुवारी रिझव्‍‌र्ह बँकेने जाहीर केलेल्या आपल्या मिनिट्स मध्ये चलनवाढीच्या दबावामुळे आणखी दर वाढ होण्याची शक्यता असल्याचे संकेत दिल्यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांना जबर धक्का बसला. याचाही परिणाम बाजाराला बसला.तसेच जॅक्सन होल इकॉनॉमिक सिम्पोजियम
मध्ये फेड प्रमुखांच्या भाषणापूर्वी (US Federal chief Jerome Powell’s speech at the Jackson Hole Symposium ).गुंतवणूकदारानी बाजारापासून लांब राहणेच पसंत केले.

दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 365.83 अंकांनी घसरून 64,886.51 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 120.90 अंकांची घट होऊन निफ्टीने 19,265.80 चा बंद दिला. Sensex slides 366 pts

( लेखक शेअरबाजारतज्ञ, तसेच Techncal and Fundamental Analyst आहेत )

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB
26 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *