मुंबई-सिंधुदुर्ग नियमित विमान सेवा या तारखेपासून सुरू

 मुंबई-सिंधुदुर्ग नियमित विमान सेवा या तारखेपासून सुरू

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणातील सर्वांत महत्त्वाचा सण असलेला गणेशोत्सव अवघ्या महिन्याभरावर आलेला असताना आपापल्या गावी जाण्यासाठी तिकिट बुकींग करण्यासाठी कोकणवासियांची धावपळ सुरू आहे. त्यामध्येच एक आनंदाची बातमी म्हणजे यावर्षी बाप्पाच्या दर्शनाला जाण्यासाठी मुंबई – सिंधुदुर्ग नियमित विमान सेवा येत्या १ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. अशा माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिली.

गेली अनेक महिने चिपी विमानतळावरुन मुंबई ते सिंधुदुर्ग या नियमित विमानसेवेचा प्रश्न प्रलंबित होता.यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नाने व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या सातत्याच्या पाठपुरव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे.

तर मग आता चिंतेचे कारण नाही कारण बस, रेल्वे सोबतच आता विमानसेवाही सुरू होत असल्याने गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासाचे सर्व मार्ग उपलब्ध झाले आहेत.

SL/KA/SL

25 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *