चांद्रयान – ३ मुळे झाली ३१ हजार कोटींची कमाई

 चांद्रयान – ३ मुळे झाली ३१ हजार कोटींची कमाई

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडींगमुळे देशभरात उत्साहाची लाट आलेली असताना शेअर बाजारातही तेजी दिसून येत आहे. एखाद्या बिग बजेट चित्रपटापेक्षाही कमी किमतीत म्हणजेच ६५१ कोटी रुपयांमध्ये पार पाडलेल्या चांद्रयान- मिशनमुळे देशातील डझनभर कंपन्यांच्या मुल्यामध्ये संयुक्तपणे 31 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 4 दिवसात या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे.

एयरोस्पेसशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये हजारो कोटींची गुंतवणूक सुरु आहे. 13 स्पेस बेस कंपन्याच्या शेअर्सच मार्केट कॅप जवळपास 31 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे.चांद्रयानचे निर्मिती,जोडणी, देखभाल आणि इतर उत्पादन कार्यात अनेक कंपन्या गुंतलेल्या होत्या. अनेक कंपन्यांनी त्यांच्या तांत्रिक सहाय्यासाठी योगदान दिले आहे. या कंपन्यांचे शेअर्स सातत्याने वाढत आहेत.हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल),लार्सन अँड टुब्रो (L&T, सेंटम इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, MTAR तंत्रज्ञान (MTAR Tech),पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लि. आणि केरळ राज्य इलेक्ट्रॉनिक्स विकास महामंडळ (केल्टन टेक सोल्युशन्स लिमिटेड) या चांद्रयानाच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या प्रमुख कंपन्यांमध्ये ही तेजी दिसून आली आहे.

चांद्रयान-3 साठी इस्रोला मॉड्यूल आणि सिस्टिम सप्लाय करणारी स्मॉलकॅप कंपनी सेंटम इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअरमध्ये या आठवड्यात 26 टक्के वाढ पाहायला मिळाली. अवंटेल, लिंडे इंडिया, पारस डिफेंस आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्सच्या शेअर्समध्ये डबल डिजीटचा वेग दिसून आला. गोदरेज इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दिसून आली.

पीटीसी इंडस्ट्रीजने पंप इंटरस्टेज हाउसिंगचा पुरवठा केला. एमटीएआर विकास इंजिन आणि टर्बो पंप आणि बूस्टर पंपसह क्रायोजेनिक इंजिन सबसिस्टम सारख्या साहित्याचा पुरवठा केला. पारसने चांद्रयान-3 साठी नेविगेशन सिस्टमचा पुरवठा केला. पीएसयू बीएचईएलने टायटेनियम टँक आणि बॅटरीचा पुरवठा केला.यात अनेक भारतीय कंपन्या 447 अब्ज डॉलरच्या ग्लोबल स्पेस मार्केटमध्ये जगाच लक्ष आपल्याकडे वेधून घेऊ शकतात.

इस्रोच्या आगामी अवकाश मोहिमांचा कार्यक्रमही निश्चित झाला आहे. लवकरच गगनयान, आदित्य एल1, या मोहिमा कार्यरत होणार आहेत. यामुळेच जगापेक्षा कमी खर्चात अवकाश तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या इस्रोमुळे येत्या काळात भारतीय आर्थिक क्षेत्रालाही उभारी मिळणार आहे.

SL/KA/SL

25 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *