नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र

 नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र

बुडापेस्ट, हंगेरी, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०२४ मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आता जगभरातील खेळाडू सुसज्ज होत आहेत. जागतिक पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरुन विशिष्ट मानांकन कमावलेले खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरत असतात.आगामी ऑलिम्पिकसाठी भारताला हमखास पदक मिळवून देणारा अ‍ॅथलिट म्हणून ज्याचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे त्या भालाफेकपटू नीरज चोप्राने आज ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले आहे.

जागतिक थलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये आज नीरज चोप्राने पहिल्या भालाफेकीतच 88.77 मीटर अंतर पार केले. ही त्याची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. तसेच तो पहिल्या प्रयत्नातच फायलनसाठी पात्र झाला आहे. तसेच पॅरिस ऑलिम्पिकसाठी देखील तो पात्र झाला. ऑलिम्पिक पात्रतेसाठी 85.50 मीटर भालाफेक करणे गरजेचे होते. नीरजसोबतच या स्पर्धेमध्ये आज किशोर जेना (80.75 मीटर) आणि डीपी मनू (81.31) या भालाफेकपटूंनी देखील जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

ऑलिम्पिक, आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याबरोबरच 25 वर्षीय नीरज चोप्रा डायमंड लीग चॅम्पियनदेखील आहे. मात्र, एकाही भारतीय खेळाडूला जागतिक अ‍ॅ​​​​​​​थलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकता आलेले नाही. नीरज चोप्राने गेल्या वर्षी ओरेगॉन येथे झालेल्या जागतिक अ‍ॅ​​​​​​​थलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 मध्ये रौप्य पदक जिंकले होते. यासह भारताची पदकासाठीची 19 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आली होती.

1983 मध्ये जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप सुरू झाल्यापासून भारताने आतापर्यंत केवळ दोनच पदके जिंकली आहेत. जागतिक अ‍ॅ​​​​​​​थलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत केवळ दोनच पदके जिंकली आहेत. अंजू बॉबी जॉर्ज पॅरिस 2003 मध्ये महिलांच्या लांब उडीत जागतिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकणारी पहिली भारतीय ठरली होती.

नीरजचा या निवडीमुळे ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी अ‍ॅथलेटिक्समध्ये एक पदक तरी निश्चित झाले असे म्हणता येईल.

SL/KA/SL

25 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *