शेतकऱ्यांची कर्ज नोटीस मागे घेण्याचा सरकारला इशारा

 शेतकऱ्यांची कर्ज नोटीस मागे घेण्याचा सरकारला इशारा

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र,मराठवाड्यात काही भागात पिके करपायला लागली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये पूर्ण पेरणी झालेली नाही यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज वसुलीकरिता नोटिस बजावण्यात येत आहे. शिंदे फडणवीस सरकारने कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना पाठवण्यात येणारी बँकांची नोटीस तात्काळ थांबवावी अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

वडेट्टीवार म्हणाले, राज्यात जून,जुलै या महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. ऑगस्ट महिन्यात देखील सरासरी पेक्षा सुमारे ६८ टक्क्यांनी पाऊस कमी आहे. १ ते १८ ऑगस्ट दरम्यान सर्वच विभागात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ८० टक्क्यांनी कमी आहे. एका बाजूने आसमानी त्यामुळे शेतकऱ्यांची पीक हातातून गेली आहेत.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज भरण्यासाठी नोटीस पाठवण्यात येत आहे.

शिंदे फडणवीस सरकार बोथट झाले असून हे सरकार संवेदनशून्य आहे. लाखो शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालं नाही पीक विमा कंपन्यांनी त्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहेत. खतांचा काळाबाजार झाला आहे. बियाणं मिळत नव्हते, बोगस बियाण्यांचा सुळसुळाट झाला होता तरीही शेतकऱ्यांनी कसंतरी पैसे उभे केले आणि पीक घेण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला कमी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे तर दुसरीकडे कृषीमंत्री बीडच्या सभेत व्यस्त आहेत. उपमुख्यमंत्री जपानला आहेत आणि मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना वाली कोण असा सवाल वडेट्टीवार यांनी यावेळी केला.

अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटीस येत आहेत. दुबार पेरणीसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना शिंदे फडणवीस सरकारचा एव्हढा जाच का असा सवाल उपस्थित करत वडेट्टीवार म्हणाले की जे अजित पवार आजपर्यंत नोटीस आल्यानंतर भूमिका मांडत होते तेही आता काहीच बोलत नाहीत . मी या झोपेचं सोंग घेतलेला सरकारला जागं करीन आणि रस्त्यावर उतरवून शेतकऱ्यांचा आक्रोश काय असतो हे दाखवून देईन. Warning to the government to withdraw the loan notice of farmers शेतकऱ्यांनी बँकेकडून येणाऱ्या नोटिसांना घाबरून न जाता त्या माझ्याकडे पाठवून द्या असे वडेट्टीवार म्हणाले.

ML/KA/PGB
25 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *