आश्रम शाळेतील ४१ विद्यार्थ्यांना विषबाधा
भंडारा दि २५ :- भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील येरली येथील आदिवासी आश्रम शाळेतील ४१ विद्यार्थ्याना विषबाधा झाली आहे. ४१ पैकी २३ विद्यार्थ्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णांमध्ये उपचारासाठी भरती केले असून १८ विद्यार्थ्यांवर उपजिल्हा रुग्णालय तुमचं येथे उपचार सुरू आहेत. उपचारानंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
गुरुवारी दुपारच्या जेवणात बटाटा आणि वाटाण्याची मिक्स भाजी विद्यार्थांना जेवणातून देण्यात आली होती. त्यानंतर जवळपास साडेतीन नंतर काही मुलांना पोट दुखी उलटी आणि मळमळ यांचा त्रास सुरू झाला. हळूहळू ही संख्या झपाट्याने वाढत गेली सुरुवातीला स्थानिक डॉक्टर ला उपचारासाठी बोलविण्यात आले. मात्र ही संख्या झपाट्याने वाढत राहिल्याने सायंकाळी साडेसहा नंतर या विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालय भंडारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही संख्या 41 पर्यंत पोहोचली असून उपचारानंतर हे सर्व विद्यार्थी आता स्थिर आहेत.
ML/KA/SL
25 Aug 2023