या रुग्णालयात झाली कॅन्सरवरील प्रोटॉन थेरपीला सुरुवात

 या रुग्णालयात झाली कॅन्सरवरील प्रोटॉन थेरपीला सुरुवात

खारघर, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॅन्सरवरील उपचारांतील अत्यंत महागडी समजली जाणारी प्रोटॉन थेरपी आता नवी मुंबईोतील खारघर येथील रुग्णालयात सवलतीच्या दरात उपलब्ध झाली आहे. १५ ऑगस्टपासून रुग्णांना ही थेरपी देण्यास सुरुवात झाली आहे. टाटा मेमोरियल सेंटर (TMC) च्या ACTREC खारघर केंद्रात प्रोटॉन थेरपीने उपचाराला सुरुवात झाली आहे. येथे कॅन्सर रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार केले जाणार आहेत. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना मोफत उपचार मिळू शकतील.

अमेरिकेत प्रोटॉन थेरपीच्या उपचारांचा खर्च 1 कोटी ते 1.5 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. असे असताना ACTREC खारघर येथे सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध होतील, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्ण मोफत उपचार घेऊ शकतील, अशी माहिती टीएमसीचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी दिली.

प्रोटोन थेरीप सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे टीएमसीचे उपसंचालक डॉ. सिद्धार्थ लष्कर यांनी सांगितले.
हा प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण झाला आहे आणि TMC आणि Ion Beam Applications (IBA) साठी हा एक मैलाचा दगड आहे.

IBA ही बेल्जियम-आधारित कंपनी असून प्रोटॉन थेरपी आणि प्रवेगक प्रणालींमध्ये जागतिक आघाडीवर आहे.
आयबीए आपल्या देशातील रुग्णांना सर्वोत्तम प्रोटॉन उपचार अनुभव देण्यास आणि टीएमसीला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास वचनबद्ध असल्याचे आयबीए इंडियाचे संचालक राकेश पाठक यांनी सांगितले.

SL/KA/SL

17 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *