पश्चिम महाराष्ट्र हादरला भूकंपाच्या धक्क्याने

 पश्चिम महाराष्ट्र हादरला भूकंपाच्या धक्क्याने

पुणे, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली आणि सातारा जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किमी खाली होता.

कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. आज सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.West Maharashtra shook by earthquake shock

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह लगतच्या गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे 6.40 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. मॉर्निग वाॅकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले. कोयना धरणापासून 20 किलोमीटर अंतरावर भूकंप धक्के जाणवले असून धरण सुरक्षित आहे. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ML/KA/PGB
16 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *