इस्त्रोच्या ‘स्पेस ऑन व्हिल्स’नागरिकांसाठी खुली

नागपूर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय अंतराळ प्रवासाची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी स्पेस ऑन व्हिल्स ही बस असून या बसचे उद्धाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल नागपुरात करण्यात आले. Istro’s ‘Space on Wheels’ open for citizens
विदर्भाच्या विविध भागात ही बस जाणार असून विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या मोहीमांची आणि आतापर्यंतच्या अंतराळ प्रवासाची माहिती देणार आहे. नागपुरातून निघून ही बस वर्धा येथे पोहोचेल. या बसमध्ये चांद्रयान-1 मोहीम, मंगलयान मोहीम, अवकाशात सोडलेले विविध उपग्रह तसेच इस्त्रोचा एकूणच आतापर्यंतचा अंतराळ प्रवास पहायला मिळणार आहे.
ML/KA/PGB
16 Aug 2023