देशाच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात यावर्षी १५ टक्के वाढ

 देशाच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात यावर्षी १५ टक्के वाढ

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चालू आर्थिक वर्षात 10 ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष कर संकलन वार्षिक आधारावर 15.73 टक्क्यांनी वाढून 6.53 लाख कोटी रुपये झाले आहे. सरकारने सांगितले की, 1 एप्रिल 2023 ते 10 ऑगस्ट 2023 पर्यंत एकूण 69,000 कोटी रिफंड जारी करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत दिलेल्या परताव्यापेक्षा हे प्रमाण 3.73 टक्क्यांनी अधिक आहे.

आयकर विभागाने शुक्रवारी सांगितले की, ‘परतावा’ समायोजित केल्यानंतर निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 5.84 लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण 15.73 टक्के अधिक आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने एका निवेदनात म्हटले आहे की, 10 ऑगस्ट 2023 पर्यंतच्या प्रत्यक्ष कर संकलनाचे तात्पुरते आकडे असे दर्शवतात की, कर संकलनात चांगली वाढ झाली आहे.

दरम्यान, 2023-24 या आर्थिक वर्षातील प्रत्यक्ष कर संकलनाच्या अंदाजपत्रकाच्या 32.03 टक्के कर संकलन आहे. चालू आर्थिक वर्षात 10 ऑगस्टपर्यंत 69,000 कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत परत केलेल्या रकमेपेक्षा 3.73 टक्के जास्त आहे.

याशिवाय, जुलै महिन्यात जारी केलेल्या आकडेवारीत असे सांगण्यात आले आहे की, चालू आर्थिक वर्षात 9 जुलैपर्यंत प्रत्यक्ष कर संकलन 15 टक्क्यांनी वाढून 5.17 लाख कोटी रुपये झाले आहे. अशा प्रकारे सरकारने एका महिन्यात 1.36 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त प्रत्यक्ष कर जमा केला आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, हा आकडा संपूर्ण आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 32.03 टक्के इतका आहे. याचा अर्थ असा की, 2023-24 या आर्थिक वर्षात सरकारच्या अंदाजे कमाईपैकी 32 टक्क्यांहून अधिक रक्कम केवळ 10 ऑगस्टपर्यंत सरकारच्या तिजोरीत आली आहे.

SL/KA/SL

11 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *