अखेर नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर
![अखेर नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2023/08/Nawab-Malik.jpg)
नवी दिल्ली दि.11( एम एमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. सुप्रीम कोर्टाने मलिकांना दिलासा देताना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला. प्रकृतीचं कारण देत वैद्यकीय जामीन मिळावा अशी याचिका नवाब मलिक यांनी केली होती. मलिकांची ही मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली. मनी लाँडरिंग प्रकरणात नवाब मलिक गेली दिड वर्षापासून तुरुंगात आहेत.
नवाब मलिक यांना मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आली होती. मुंबईती कुर्ला येथील जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत. मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इक्बाल कासकर यांच्या चौकशीदरम्यान मलिक यांचं नाव समोर आलं होतं. 23 फेब्रुवारी 2022 रोजी नवाब मलिकांना ताब्यात घेण्यात आलं. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम रिअल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडिंग करतो आणि रिअल इस्टेटचे व्यवहार हे मनी लॉन्ड्रींगच्या माध्यमातून केले जातात. यासंदर्भात जवळपास नऊ ठिकाणी ईडीने धाडसत्र राबवले होतं.
SW/KA/SL
11 Aug 2023