आदिवासी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

 आदिवासी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

ठाणे , दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शहापूर तालुक्यातील अजनूप ग्रामपंचायत हद्दीतील सावरकुट गावात आदिवासी बांधवांची १९ घरे आहेत. जवळपास या गावाची लोकसंख्या १०० हून अधिक आहे. येथील नागरिकांना पावसाळ्यात वाहणाऱ्या ओढ्यावरून ये जा करण्यासाठी रस्ता नसल्याने येथील जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. ओढ्यावर नागरिकांनी एक भले मोठे लाकूड ठेऊन या लाकडावरून ये-जा करून आपली दैनंदिन कामे आदिवासी बांधव करत आहेत. मात्र या तकलादू आणि जीवघेण्या प्रवासातून आपली सुटका कधी होणार असा संतप्त सवाल सावरकुट वासीय करत आहेत. या गावातील विद्यार्थी जवळच असलेल्या एकात्मिक आदिवासी प्रकल्पाच्या शिरोळ आश्रम शाळेत निवासी शिक्षण घेत आहेत. सुटीच्या दिवशी घरी जातांना याच लाकडाचा एकमेव आधार असल्याने याच लाकडावरून विद्यार्थी जीवघेणा प्रवास करत असतात.

ML/KA/PGB 5 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *