माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह मुंबई महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मुंबईच्या आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग 1500 रुपयांऐवजी 6800 रुपयांना खरेदी केल्याचं ईडीने (ईडी) म्हटलं आहे. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप ईडीने केला. कोविड काळात किशोरी पेडणेकर या मुंबईच्या महापौर होत्या. ईडीच्या तक्रारी वरून
किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात बॉडी बॅग्ज खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. 1500 रुपयांची मृतदेह ठेवण्याची बॉडी बॅग 6700 रुपयांनी घेतली. मुंबईच्या महापौर, अतिरिक्त आयुक्त आणि वेदांत इनोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईडीने 21 जून रोजी राज्यभर छापे मारले होते. या छाप्यात 68 लाख 65 हजार रुपये रोकड, 150 कोटींची स्थावर मालमत्ता सील करण्यात आली होती. या शिवाय 15 कोटींची एफडी आणि इतर गुंतवणूकही ईडीला आढळली होती. 21 जूनला ईडीने मारलेल्या छापात्यात उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, सुजीत पाटकरसह 10 ते 15 जणांचा समावेश होता. A case has been registered against former mayor Kishori Pednekar
ML/KA/PGB
5 Aug 2023