मीना वैशंपायन यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार

 मीना वैशंपायन यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मीना वैशंपायन यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा २०२३ चा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सोमवार, १४ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजतां पुणे येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार सोहळ्यात अंतर्नाद मासिकाचे संपादक आणि ज्येष्ठ लेखक भानू काळे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या विद्यमाने मसापचे माजी कार्याध्यक्ष आणि प्रसिद्ध समीक्षक के. डॉ. गं. ना. जोगळेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठी वाङमय क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल दरवर्षी एक मानाचा पुरस्कार देण्यात येतो. रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून यंदाचा २०२३ चा या पुरस्काराचा बहुमान लेखन , संशोधन, आणि संस्थात्मक कार्य या बहुमोल कार्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सौ. मीना वैशंपायन यांना प्रदान करण्याचा निर्णय महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेने घेतला आहे.

डॉ. मीना वैशंपायन या एम. ए., बी. एड., पीएच.डी. (मराठी व संस्कृत) असून ख्यातनाम एशियाटिक सोसायटीच्या उपाध्यक्ष आहेत. त्यांची ‘दुर्गापर्व’, ‘ज्ञानकोशकार केतकर’, ‘साहित्यवेध’, ‘ती’चं अवकाश’ इत्यादी एकूण १४ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ‘दुर्गापर्व’ला राज्य शासनाचा उत्कृष्ट समीक्षेचा पुरस्कार मिळाला आहे. ‘तीचं अवकाश’ला सावाना, नाशिक संस्थेचा स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर पुरस्कारही डॉ. मीना वैशंपायन यांना मिळाला आहे.
डॉ. मीना वैशंपायन यांच्या ग्रंथसंपदेत ‘स्मरण.. असामान्य वाङ्मय-संशोधकाचे’, ‘संस्कृतिसंकराच्या संघर्षांच्या कथा!’, ‘असंही एक वनोपनिषद!’, ‘बखर महायुद्धातील विरांगनांची!’, ‘ऐसा ज्ञानसागरू..’, ‘पिंजऱ्यातल्या पक्ष्याचं गाणं!’, ‘हवा आहे ‘चौथा कमरा’!’, ‘अस्वस्थ कातरवेळेचे प्रश्नोपनिषद..’, ‘अशीही नामांतरे’, ‘पुस्तकं आयुष्य बदलवणारी.. इतिहास घडविणारी..’, ‘इतिहास.. प्रार्थना समाजाचा!’, ‘प्रश्न विचारण्याचं धाडस’ आदींचा समावेश आहे.
ML/KA/SL
5 Aug. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *