धर्म लपवून मुलींना फसवणाऱ्या प्रकरणात आता पोलिसांची स्वतंत्र कारवाई पद्धती

 धर्म लपवून मुलींना फसवणाऱ्या प्रकरणात आता पोलिसांची स्वतंत्र कारवाई पद्धती

धर्म लपवून मुलींना फसवणाऱ्या प्रकरणात आता पोलिसांची स्वतंत्र कारवाई पद्धती

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात धर्म लपवून मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न करण्याचे प्रकार रोखण्यासाठी पोलीस महासंचालकांना स्वतंत्र कारवाईची पद्धत निश्चित करण्याच्या सूचना दिल्या जातील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या लक्षवेधी वर दिली , हरिभाऊ बागडे यांनी ती उपस्थित केली होती. राम सातपुते , हरीश पिंपळे, अस्लम शेख आदींनी उप प्रश्न विचारले.

अशा प्रकारे फसवल्या गेलेल्या मुलींसाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत दिली जाईल. अशा प्रकारच्या जितक्या तक्रारी आल्या आहेत त्यांची दखल तातडीने घेतली जाईल असेही फडणवीस म्हणाले.

औरंगजेब स्टेटस प्रकरणी विशेष तपास पथक..

औरंगजेबाचे स्टेटस ठेऊन त्याचे गौरवगान, उदात्तीकरण करणाऱ्यांवर , दोन समुदायामध्ये तेढ निर्माण करण्याच्या प्रकाराबद्दल सखोल चौकशी केली जात आहे, गरज पडल्यास विशेष चौकशी पथक स्थापन केले जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली, नितेश राणे यांनी ही मागणी लक्षवेधी मार्फत केली होती.

अशा घटना जाणीवपूर्वक घडवून कोणी आणतो का , यामागे नेमके कोण आहे याची माहिती घेतली जात आहे. काही माहिती हाती आली आहे असं फडणवीस म्हणाले.

प्रकाश आंबेडकर औरगजेबाच्या कबरीवर गेले होते त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का नाही अशी विचारणा अबू आझमी यांनी केली.
प्रकाश आंबेडकर यांनी तिथे जाऊ नये अशी विनंती आपण त्यांना केली होती मात्र तिथे जाणं हा गुन्हा नाही , जाती धर्मात तेढ निर्माण करणं हा गुन्हा आहे असं फडणवीस म्हणाले.

अशा प्रकरणात समाज माध्यमांचा वापर केला जातो, त्यासाठी सायबर क्राईम साठी केंद्राचा कायदा आहे त्यात सुधारणा होत आहे , राज्याने आपल्या सूचना दिल्या आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय दिल्याने बंधनं येतात अशी माहिती ही फडणवीस यांनी यावेळी दिली. In the case of cheating girls by hiding their religion, the police now have an independent action method

ML/KA/PGB
2 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *