यापुढे सर्व सरकारी बांधकामे दगडाच्या वाळू तूनच…

 यापुढे सर्व सरकारी बांधकामे दगडाच्या वाळू तूनच…

मुंब, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील सर्व शासकीय बांधकामांसाठी यापुढे केवळ दगडातून तयार केलेली वाळूच वापरण्याचं बंधन घालण्याचे धोरण जाहीर केलं जाईल अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली . याबाबतचा प्रश्न प्रशांत बंब यांनी उपस्थित केला होता. अनेकविध अडचणींमुळे सरकारने आणलेलं वाळू धोरण सुरळीत होण्यासाठी वेळ लागत आहे असं मंत्री म्हणाले. Henceforth all government constructions are made of stone and sand.

राष्ट्रीय हरित लवादाने एक जून ते तीस सप्टेंबर या कालावधीत वाळू उत्खनन करण्यास बंदी घातली आहे, याशिवाय अनेक बंधनं आहेत त्यामुळे आमचं वाळू धोरण अपेक्षित यश प्राप्त करू शकलं नाही, यासाठी तयार करण्यात आलेल्या पोर्टल मध्येही अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत, त्या दूर केल्या जात आहेत असं विखे पाटील म्हणाले.

राज्यात २८ लाख ४७ हजार ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, मात्र सध्या पुरेशा प्रमाणात वाळू देऊ शकलेलो नाही, वर्षानुवर्षे या व्यवसायात अनेक वाईट सवयी लागल्या आहेत त्या दूर होण्यास सभागृहाने मदत करावी आणि सूचना कराव्यात अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. बाळासाहेब थोरात, नाना पटोले , राजेश टोपे, हरिभाऊ बागडे, अशोक चव्हाण आदींनी उप प्रश्न विचारले होते.

ML/KA/PGB
2 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *