प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाईंची आत्महत्या

 प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाईंची आत्महत्या

कर्जत, जि. रायगड, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत येथील त्यांच्या ND स्टुडीओ येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, एनडी स्टुडिओमधील काही कर्मचाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत नितीन देसाई दिसून आले. कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसांना याबद्दल कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

नितीन देसाई यांच्या आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास केला जात आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यानंतर पुढील तपास सुरू आहे. गेला काही काळ ते आपला बहुतांश वेळ ND स्टुडिओत घालवत होते. काही दिवसांपूर्वी नितीन देसाई यांच्यावर 51 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप झाला होता.

चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त नितीन देसाई यांनी हम दिल दे चुके सनम, लगान, देवदास, जोधा अकबर आणि प्रेम रतन धन पायो या चित्रपटांचे सेट डिझाइन केले होते. २००५ मध्ये नितीन देसाईंनी मुंबईजवळील कर्जत येथे ५२ एकर (२१ हेक्टर) मध्ये पसरलेला एनडी स्टुडिओ सुरु केला.

SL/KA/SL

2 August 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *