AI च्या मदतीने ऑपरेशन, पॅरालाईज्ड रुग्ण झाला तंदुरुस्त

 AI च्या मदतीने ऑपरेशन, पॅरालाईज्ड रुग्ण झाला तंदुरुस्त

न्यूयॉर्क, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : AI चे फायदे-तोटे यावर जगभर चर्चेच्या फैरी झडत असताना योग्य पद्धतीने अवलंब केल्यास AI द्वारे मानवी आयुष्य सुकर होऊ शकते. याचे अमेरिकेतील वैद्यकीय क्षेत्रातील एक उदाहरण नुकतेच समोर आले आहे. Artificial Intelligence च्या मदतीने केलेल्या सर्जरीमुळे अर्धांगवायूचा झटका आलेल्या व्यक्तीला पुन्हा एकदा पहिल्यासारखं आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे.हा वैद्यकीय क्षेत्रातील चमत्कार मानला जात आहे.

अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील 45 वर्षीय किथ थॉमस यांना पाण्यात उडी मारल्यानंतर पक्षघाताचा झटका आला होता. मशीन लर्निंग आधारित सर्जरी केल्यानंतर त्याच्य पुन्हा एकदा हालचाल करणे शक्य झाले आहेत. यासाठी माइक्रोइलेक्ट्रोड इंप्लांटच्या मदतीने या व्यक्तीचा मेंदू संगणकाशी जोडण्यात आला होता. थॉमस यांनी सर्जरीला पैसे गोळा करण्यासाठी एक डोनेशन पेज तयार केलं होतं. अनेकांनी त्यांना ढोबळ मनाने मदत केली होती. थॉमस यांच्यावर तब्बल 15 तास सर्जरी सुरु होती. यावेळी ते जागे होते आणि सतत डॉक्टरांशी बोलत होते.

मॅनहॅसेटमधील फिनस्टीन इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्चमधील तज्ज्ञांनी ठामपणे म्हटलं आहे की, थॉमसचं हे उदाहरण अंधत्व, बहिरेपणा, झटके येणं, सेरेब्रल पाल्सी आणि पार्किन्सन्स यांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी AI-इन्फ्युज्ड शस्त्रक्रियेची मदत घेण्यात उपयुक्त ठरू शकतं.

फिनस्टीन इन्स्टिट्यूट ऑफ बायोइलेक्ट्रॉनिक मेडिसिनचे प्राध्यापक चाड बॉटन यांनी न्यूयॉर्क पोस्टशी बोलताना सांगितलं की, “अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीला त्याचा मेंदू, शरीर आणि पाठीचा कणा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जोडून हालचाल आणि संवेदना प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आम्ही जगभरातील लोकांना मदत करत राहू. यापेक्षा मोठी प्रकरणंही आम्ही कदाचित हाताळू”.

थोडक्यात AI तंत्राचा योग्य आणि सावधगिरीने अवलंब केल्यास भविष्यात मानवजातीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे पुरावे अशा उदाहरणांतून आता समोर येऊ लागले आहेत.

SL/KA/SL

31 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *