जागतिक पोलीस गेम्समध्ये महाराष्ट्र पोलीसांची सुवर्णपदकांची हॅट्रीक

 जागतिक पोलीस गेम्समध्ये महाराष्ट्र पोलीसांची सुवर्णपदकांची हॅट्रीक

विनिपेग-कॅनडा,दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे झालेल्या ‘वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम’ स्पर्धेत ट्रिपल महाराष्ट्र केसरी तथा अपर पोलिस अधीक्षक विजय चौधरी यांनी कुस्तीमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. महाराष्ट्राचा तीन वेळचा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता चाळीसगावच्या विजय चौधरी यांच्यासह मुंबईचा नरसिंग यादव आणि बीडचा राहुल आवारे हे भारतासाठी सुवर्णपदकाची हॅट्रिक करत यश संपादन केले .

पुरुषांच्या १२५ किलो वजन गटात फ्रीस्टाइल प्रकारात अंतिम लढतीत विजय चौधरीने अमेरिकेच्या जे. हेलिंगरवर १० गुणांची मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर ११-०१ गुणांनी सामना जिंकत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

तर राहुल आवारेने ६१ किलो वजन गटात पोलंडच्या मल्लाला १४-४ गुणांनी पराभूत करत सोेनेरी कामगिरी केली. नरसिंग यादवने ७९ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर शरीरसौष्ठव स्पर्धेत सुभाष पुजारीने रौप्यपदक व मेन फिजिक्स प्रकारात कांस्यपदक मिळवले. सचिन शिंदेने शरीरसौष्ठव स्पर्धेत कांस्य व मेन फिजिक्स प्रकारात रौप्यपदक पटकावले आहे.

SL/KA/SL

31 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *