विद्यार्थ्यांनी वाळू चित्रातून दिला, वाघ वाचविण्याचा संदेश

 विद्यार्थ्यांनी वाळू चित्रातून दिला, वाघ वाचविण्याचा संदेश

वाशिम, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाघ टिकला तरच जंगल टिकेल आणि पर्यायाने निसर्गातील अन्नसाखळी कायम राहील. वाघाचे अधिवास टिकून राहून वाघांच्या प्रजातीचे संरक्षण व्हावे या अनुषंगाने दरवर्षी २९ जुलै हा दिवस जागतिक वाघ दिन म्हणून साजरा होतो.

मांजर कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून वाघाची गणना होते व अन्न साखळीतील सर्वोच्च स्थानावर वाघ असतो. वाघांबाबत जनजागृती व्हावी व त्यांची संख्या वाढावी म्हणून वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा कामरगांव येथील विद्यार्थ्यांनी वाळूचित्र व टॅटूची स्पर्धा घेऊन ववाघांचे संरक्षण करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली.

वाघ आपल्या पर्यावरण चळवळीतील सर्वांत वरच्या स्थानावरचा घटक आहे. तो वाचला तरच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल व माणूसही संकटात येणार नाही. त्यामुळे ‘वाघ वाचवा’चा संदेश देण्यासाठी जि.प.विद्यालय कामरगाव येथिल विद्यार्थ्यांनी हातावर वाघांचे लोगो व टॅटू काढुन वाघ वाचविण्याचा संदेश दिला. हा अभिनव उपक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात उपक्रमशिल शिक्षक गोापाल खाडे यांनी राबविला.

निसर्ग कट्टा अकोला आणि जि.प.विद्यालय कामरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात तब्बल २०० विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेत व्याघ्र संरक्षणाची शपथ घेतली.

ML/KA/SL

29 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *