पावसाचा जोर ओसरला, नागरिकांना दिलासा

कोल्हापूर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्यानं रात्री राधानगरी धरणाचे खुले झालेले पाचही स्वयंचलित दरवाजे बंद झाले. यामुळे कोल्हापूरकरांना महापुरापासून दिलासा मिळाला आहे.
आज सकाळी 10 वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी 41.3 फुटांवर होती. धोका पातळी त्रेचाळीस फूट इतकी आहे.
जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी स्थिरावली असली तरी अद्यापी 53 बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे वाहतूक काहीशी ठप्पच आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध नद्यांना आलेल्या पुरामुळे 10 राज्यमार्ग आणि 23 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 33 मार्ग बंदच आहेत. त्याशिवाय एसटीचेही अनेक मार्ग बंद राहिले आहेत.
राधानगरी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग बंद झाला असला तरी पंचगंगेच्या पूर पातळीत मात्र दिवसभर संथ वाढ सुरू होती.
इथल्या जगबुडी पुलाजवळ पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कोल्हापूर- रत्नागिरी, कोल्हापूर- राधानगरी रस्त्यावर पाण्यातूनच एकेरी वाहतूक सुरू होती.
दूधगंगा धरण 68 टक्के तर वारणा 78 टक्के भरलं आहे. वारणा धरणातून 6 हजार 788 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
अलमट्टी धरणातून 75 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
आज सकाळी सहा वाजता कडवी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलं भरला.तर जांबरे आणि कोदे या आधीच पूर्ण क्षमतेनं भरली आहेत.आज कोल्हापूरला येलो अलर्ट देण्यात आला आहे.
ML/KA/SL
29 July 2023