या आफ्रिकन देशात लष्करी उठाव

 या आफ्रिकन देशात लष्करी उठाव

निएमे, नायजर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम आफ्रिकेतील नायजर या देशात लष्करी उठाव झाला असून सशस्त्र सैनिकांनी राष्ट्रपती भवनात घुसून त्याचा ताबा घेतला. राष्ट्रपती मोहम्मद बज्मे यांना सत्तेवरून हटवून तुरुंगात टाकण्यात आले आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, लष्कराने राष्ट्रीय टीव्हीवर सत्तापालटाची घोषणा केली. कर्नल अमादौ अब्द्रामाने इतर लष्करी अधिकार्‍यांसह टीव्हीवर दिसले आणि राष्ट्रपतींना सत्तेतून काढून टाकल्याची घोषणा केली. नायजर हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. नायजरचा ८०% भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे.नायजर हा जगातील सर्वांत गरीब व अविकसित देशांपैकी एक आहे.

या उठावाबाबत कर्नल अमादौ अब्द्रामाने म्हणाले, “बिघडलेली सुरक्षा परिस्थिती आणि खराब प्रशासनामुळे आम्ही राष्ट्रपतींची सत्ता संपवत आहोत.नायजरच्या सीमा सील केल्या आहेत. देशभरात कर्फ्यू जाहीर करण्यात आला असून सर्व सरकारी कार्यालये बरखास्त करण्यात आली आहेत.”

संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी राष्ट्रपतींशी बोलुन त्यांना संयुक्त राष्ट्राचा पूर्ण पाठिंबा देऊ केला आहे.मात्र नायजरच्या सैन्याने कोणत्याही परकीय हस्तक्षेपाविरुद्ध चेतावणी दिली आणि त्यांना परिणामांसाठी तयार राहण्यास सांगितले आहे.

दरम्यान गेल्या ३ वर्षात आफ्रिकेतील बुर्किना फासो, गार्डनर, चाड आणि गिनी या देशांमध्ये लष्करी उठाव झाले आहेत.

SL/KA/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *