महाराष्ट्र विधिमंडळाचे कामकाज ४ ऑगस्ट पर्यंत

 महाराष्ट्र विधिमंडळाचे कामकाज ४ ऑगस्ट पर्यंत

मुंबई दि.२७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ठरल्यानुसार ४ ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार असून याच आठवड्यात हे अधिवेशन गुंडाळण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

आज मुंबई येथील विधानभवनामध्ये कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. त्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ४ ऑगस्ट पर्यंत सुरू ठेवण्याचे निश्चित करण्यात आले.

या बैठकीत समितीने विचार विनिमय करून सभागृहाचे कामकाज पुढील प्रमाणे असावे असा निर्णय घेतलेला आहे.

विधिमंडळ सल्लागार समिती बैठकीत खालील मुद्दयावर चर्चा व निर्णय झाला.

(१) शुक्रवार, दिनांक २८ जुलै, २०२३ रोजी शासकीय कामकाज व अशासकीय कामकाज (विधेयके) होतील.
(२) शनिवार, दिनांक २९ जुलै, २०२३ (शासकीय सुट्टी)
(३) रविवार, दिनांक ३० जुलै, २०२३ (शासकीय सुट्टी)
(४) सोमवार, दिनांक ३१ जुलै, २०२३ (सभागृहाची बैठक होणार नाही.)
(५) मंगळवार, दिनांक १ ऑगस्ट, २०२३ (मा.पंतप्रधान महोदयांचा पुणे दौरा असल्याने) सभागृहाची बैठक होणार नाही.
(६) बुधवार, दिनांक २ ऑगस्ट, २०२३, शासकीय कामकाज
(७) गुरुवार, दिनांक ३ ऑगस्ट, २०२३ रोजी शासकीयक कामकाज, विरोधी पक्षाचा प्रस्ताव (अंतिम आठवडा प्रस्ताव)
(८) शुक्रवार, दिनांक ४ ऑगस्ट, २०२३ , शासकीय कामकाज, अशासकीय कामकाज (ठराव)

या बैठकीला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, आमदार सर्वश्री. प्रवीण दरेकर, सतीश चव्हाण, विजय ऊर्फ भाई गिरकर, प्रसाद लाड, एकनाथ खडसे, अनिल परब, सतेज ऊर्फ बंटी पाटील, अशोक ऊर्फ भाई जगताप, शशिकांत शिंदे, प्रसाद लाड, कपिल पाटील, विधिमंडळ सचिव १ जितेंद्र भोळे, सचिव २ विलास आठवले, उपसचिव ऋतुराज कुडतरकर, अवर सचिव पुष्पा दळवी आदी उपस्थित होते.

ML/KA/SL

27 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *