नागपुरात रात्रभर जोरदार पाऊस ,पाणी साचले

 नागपुरात रात्रभर जोरदार पाऊस ,पाणी साचले

नागपूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नागपुरात झालेल्या जोरदार वादळी पावसाने अनेक भागात पाणी साचले, नदी, नाले वाहत आहे ओसंडून, अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. काल रात्रभर मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागात पावसाचे पाणी साचले असून नदी, नाले ओसंडून वाहत आहे.. Heavy rain and water accumulated in Nagpur overnight

पुलाच्या वरती पाणी वाहत असल्याने अनेक वस्त्या जलमय झाल्या आहेत.
अनेक घराचं नुकसान झाले असून नागरिकांचा घरामध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागल्याची परिस्थिती नागपूर जिल्हात निर्माण झाली आहे. रात्री पासून पावसाने विश्रांती घेतली नसून पावसाची संततधार सुरूच आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यात रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे सुरक्षेचा अनुषंगाने जवळपास सर्वच शाळांनी शाळेला सुट्टी घोषित केली आहे.पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचल्याने शहरातील वाहतूक खोळबंली आहे.

ML/KA/PGB
27 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *