पंचगंगेची पातळी चाळीस फुटांवर स्थिर…

कोल्हापूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडलेले असून त्यातून 7 हजार 112 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पूर्जन्य स्थितीमुळे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील पूर प्रवण क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.Level of Panchganga stable at forty feet…
जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली दोनशेहून अधिक गावांचा थेट संपर्क तुटलेला आहे. पंचगंगेची पाणी पातळी सध्या चाळीस फुटांवर स्थिर आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत.पंचगंगेची पाणी पातळी वाढून ती धोका पातळी ओलांडण्याची आज शक्यता आहे.
राधानगरी धरणासह कासारी, कुंभी आणि कोदे धरणांतूनही पाण्याचा विसर्ग होत आहे. जिल्ह्यातील सर्व धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली. आज सकाळी नऊ वाजेपर्यंत पंचगंगेची पूर पातळी 40.5 फुटांवर स्थिरावली होती.
अलमट्टी धरणातून 85 हजार 857 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
अलमट्टी धरणातील पाणीसाठा बाबत समन्वय सुरू आहे.गरज भासल्यास एनडीआरएफ आणखी एक तुकडी पाचारण करण्यात येणार आहे.
राधानगरी धरणातील पाणी भोगावती नदीत जाऊन पंचगंगेत याला आणि पुढे शहरापर्यंत पोहोचायला 15 तास लागतात. त्यामुळे राधानगरी नदीकाठची गावं,कोल्हापूर शहर, हातकणंगले आणि शिरोळ या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अनेक गावांतील लोकांना आणि जनावरांना निवारा गृहांमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे.
ML/KA/PGB
27 July 2023