वर्धा जिल्ह्यात रेड अलर्ट , अनेक रस्ते बंद

 वर्धा जिल्ह्यात रेड अलर्ट , अनेक रस्ते बंद

वर्धा, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यत पाऊस परिस्थिती बाबत रेड अलर्ट घोषित करण्यात आला असून वर्धा जिल्ह्यातील सर्व शाळांना जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने सुट्टी देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील देवळी तालुकातील आंजी ते पिंपळगाव मार्गावरील पुलावरून पाणी वाहत आहे तसेच आंजी ते अंदोरी मार्गावरील पुलावरून देखील पाणी वाहत आहे.

गंगापूर पुलावरून पाणी वाहत आहे. त्यापैकी गंगापूर गावाचा संपर्क तुटला आहे व इतर गावांना पर्यायी मार्ग आहे. समुद्रपूर तालुक्यातील वासी जवळील पुलावरून पाणी असल्याने नंदोरी वासी रस्ता सद्या बंद आहे..

हिंगणघाट शहरात महाकाली नगरी मध्ये काही ठिकाणी पाणी घुसले आहे.

देवळी तालुक्यातील बोरगाव ते अलोडा मार्ग बंद झाला आहे.

समुद्रपूर तालुका वाघाडी नाला
समुद्रपुर- वर्धा मार्ग (शेडगाव मार्गे) बंद झाला आहे. याच तालुक्यातील भोसा – सिंधी मार्ग बंद आहे.

सेलू तालुक्यातील सिंदी-पिंपरा-हेलोडी रस्त्यावरील नाल्याला पूर आल्याने पिंपरा व हेलोडी येथे वाहतुकीसाठी असलेला पर्यायी रस्ता बंद झालेला आहे.
सेलू तालुक्यातील
सिंदी रेल्वे ते दिग्रज रस्ता, सिंदी रेल्वे ते पळसगाव बाई रस्ता, पहेलानपुर ते दहेगाव स्टे रस्ता, आलगाव ते शिवनगाव रस्ता तसेच परसोडी ते भानसोली रस्ता नाल्याच्या वरुन पाणी वाहत असल्याने तात्पुरता बंद झालेला आहे. तालुक्यातील खडका येथे बोर नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने रस्ता बंद आहे.. Red alert in Wardha district, many roads closed

ML/KA/PGB
27 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *