सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण , विरोधकांचा सभात्याग

 सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण , विरोधकांचा सभात्याग

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या भारद्वाज स्पिक्स या ट्विटर हॅण्डल , इंडिया टेलस्, हिंदू पोस्ट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ट्विटर कंपनीकडून अधिक माहिती आल्यावर तातडीने त्या हॅण्डल वर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. याबाबतचा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी तो उपस्थित केला होता, मात्र उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी प्रश्नोत्तराचा तास संपल्यावर सभात्याग केला.

गुन्हा तत्काळ दखल केला होता ट्विटर इंडियाला तीन पत्रे देऊन माहिती मागितली आहे मात्र ती येण्यास वेळ लागतो आहे, ती येताच आरोपीच्या मुसक्या बांधल्या जातील असं फडणवीस म्हणाले, मात्र काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी जोरदार आक्षेप घेत आरोपी अजून का अटक होत नाही अशी विचारणा केली, तोवर तास संपला, इतर कागदपत्रे पटलावर ठेवण्यास सुरुवात झाली, थोरात पुन्हा उभे राहून बोलू लागले त्यांना अध्यक्षांनी परवानगी न दिल्यानं विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.

ML/KA/SL

27 july 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *